कोविड लसीकरण मोहिमेने 10 कोटींचा टप्पा ओलांडला

दैनंदिन एकूण नव्या कोरोनाबाधितांपैकी 81% 10 राज्यांमधील

देशभरात कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीच्या दिलेल्या मात्रांच्या एकूण संख्येने आज 10 कोटींचा टप्पा ओलांडला.

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या प्राथमिक अहवालानुसार आजपर्यंत 15,17,963 सत्रांमधून देशभरात लसीच्या एकूण 10,15,95,147 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 90,04,063 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या 55,08,289  आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांपैकी, 99,53,615 कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा, तर  47,59,209 कर्मचाऱ्यांन अदुसरी मात्रा देण्यात आली आहे.  60 वर्षावरील वयोगटातील पहिली मात्रा घेणाऱ्या 3,96,51,630 लाभार्थ्यांचा,तर याच वयोगटातील दुसरी मात्रा घेणाऱ्या 18,00,206 लाभार्थ्यांचा समावेश आहे व लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 45 ते 59 वर्षे वयोगटातील  3,02,76,653 लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या  45 ते 59 वर्षे वयोगटातील  6,41,482 लाभार्थ्यांचा, या एकूण आकडेवारीत समावेश आहे.

HCWs FLWs Age Group 45-60 years Over 60 years  

Total

1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose
90,04,063 55,08,289 99,53,615 47,59,209 3,02,76,653 6,41,482 3,96,51,630 18,00,206 10,15,95,147

एकूण लसीकरणापैकी 60.27% मात्रा 8 राज्यांमध्ये देण्यात आल्या.

गेल्या 24 तासात  35 लाखांपेक्षा अधिक  लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

देशव्यापी लसीकरणाच्या 85 व्या दिवशी (10 एप्रिल 2021 रोजी) लसींच्या 35,19,987 मात्रा देण्यात आल्या.  यापैकी,  एकूण 42,553 सत्रांमधून  31,22,109 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर 3,97,878 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

Date: 10th April,2021
HCWs FLWs 45 to <60 years Over 60 years Total Achievement
1stDose 2ndDose 1stDose 2nd Dose 1stDose 2nd Dose 1stDose 2nd Dose 1stDose 2ndDose
15,690 28,468 86,285 1,00,174 20,21,609 59,418 9,98,525 2,09,818 31,22,109 3,97,878

प्रतिदिन 38,34,574 लसीकरण मात्रा देत,  भारत हा आजही जगभरात दररोज लसीकरणाच्या मात्रांची संख्या सर्वाधिक देणारा देश म्हणून आघाडीवर आहे.

भारतात आणि इतर देशात दिल्या गेलेल्या सरासरी दैनंदिन मात्रांचा तुलनात्मक आकडा दर्शवणारा आलेख खाली दिला आहे.

भारतातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात 1,52,879 रुग्णसंख्या नोंदवली गेली.

नव्याने आढळलेल्या दैनंदिन  रुग्णसंख्येच्या एकूण आकड्यापैकी 80.92% रुग्णसंख्या ही  महाराष्ट्र, छत्तीसगढ़, उत्तरप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थान या 10 राज्यांमधील आहे.

महाराष्ट्रात नव्याने बाधितांची रुग्णसंख्या सर्वाधिक म्हणजे 55,411 तर त्या पाठोपाठ छत्तीसगढ़मध्ये 14,098 व उत्तर प्रदेशात 12,748 ही नवीन बाधितांची रुग्णसंख्या आहे.

वर जाणारा आलेख 16 राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्या वाढल्याचे दाखवत आहे.

भारतात, एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या 11,08,087 झाली असून ती देशातील एकूण पॉझिटिव्ह केसेसच्या 8.29%  आहे. 24 तासात एकूण बाधित रुग्णसंख्येत 61,456 नी वाढ नोंदवली गेली.

भारतातील एकूण रुग्णसंख्येच्या 70.82% रुग्णसंख्या ही महाराष्ट्र, छत्तीसगढ़, उत्तरप्रदेश, कर्नाटक व केरळ या पाच राज्यांमधील आहे तर एकट्या महाराष्ट्रातील एकूण बाधित रुग्णांचे प्रमाण  48.57% आहे.

भारतातील बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख खाली दिला आहे.

भारतात आजपर्यंत एकूण 1,20,81,443 जण कोविडमुक्त झाले. राष्ट्रीय स्तरावरील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 90.44% इतका आहे.

गेल्या 24 तासांत 90,584 जण बरे झाले.

गेल्या 24 तासांत 839  कोविड रुग्णांचे मृत्यू झाले असून, त्यामुळे मृत्यूदरात सातत्याने वाढ होत आहे.

एकूण मृत्यूंच्या नवीन संख्येपैकी 86.41% मृत्यू दहा राज्यांमधील आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 309 मृत्यू. त्यामागे छत्तीसगढ़मध्ये 123 दैनिक मृत्यू झाले आहेत.

गेल्या 24 तासांत दीव दमण, दादरा नगरहवेली, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, सिक्किम, मिझोराम, मणीपूर, लक्षद्विप, अंदमान निकोबार बेटे व अरुणाचल प्रदेश या 10 राज्यांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही.