देशातील रोगमुक्ती दर सध्या 93.18 टक्के

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 21,87,205

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 71 लाख (71,10,445) मात्रा देण्यात आल्या. त्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 161 कोटी 92 लाखांचा (1,61,92,84,270) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,74,72,203 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे

 

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,91,997
2nd Dose 98,17,823
Precaution Dose 27,07,857
FLWs 1st Dose 1,83,90,938
2nd Dose 1,71,33,844
Precaution Dose 26,22,380
Age Group 15-18 years 1st Dose 4,15,77,103
Age Group 18-44 years 1st Dose 53,39,04,245
2nd Dose 38,70,64,716
Age Group 45-59 years 1st Dose 19,90,38,358
2nd Dose 16,61,68,085
Over 60 years 1st Dose 12,40,49,287
2nd Dose 10,37,37,618
Precaution Dose 26,80,019
Precaution Dose 80,10,256
Total 1,61,92,84,270

 

गेल्या 24 तासात 2,59,168 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,65,60,650 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 93.18 टक्के झाला आहे.

गेल्या 24 तासात, देशात 3,33,533 नव्या कोविड बाधितांची  नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 21,87, 205  इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 5.57 टक्के आहे.

 

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरू आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 18,75,533 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 71 कोटी 55 लाखांहून अधिक (71,55,20,580) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 16.87 टक्के आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 17.78 टक्के इतका आहे.