कोरोनामुक्तीचा दर सध्या 95.91%

गेल्या 24 तासात 1,07,474 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या  45  लाखांहून अधिक (45,10,770) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 169.46 कोटी (1,69,46,26,697 ) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,87,79,150 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,97,677
2nd Dose 99,00,833
Precaution Dose 36,48,595
FLWs 1st Dose 1,84,01,238
2nd Dose 1,73,13,939
Precaution Dose 46,92,423
Age Group 15-18 years 1st Dose 4,92,84,464
2nd Dose 56,62,424
Age Group 18-44 years 1st Dose 54,46,63,377
2nd Dose 41,56,19,074
Age Group 45-59 years 1st Dose 20,09,69,761
2nd Dose 17,39,45,069
Over 60 years 1st Dose 12,53,66,811
2nd Dose 10,83,74,356
Precaution Dose 63,86,656
Precaution Dose 1,47,27,674
Total 1,69,46,26,697

 

गेल्या 24 तासांत 2,13,246  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून )  4,04,61,148 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 95.91% इतका आहे.

गेल्या 24 तासात 1,07,474  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 12,25,011 आहे.देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण   2.90% आहे.

 

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 14,48,513  चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण  74.01 कोटींपेक्षा जास्त  ((74,01,87,141)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  10.20% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 7.42% नोंदविण्यात आला आहे.