1.86 लाख नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद, गेल्या 44 दिवसातली सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 9.00%, सलग चौथ्या दिवशी तो 10% पेक्षा कमी
भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 23,43,152 पर्यंत कमी झाली आहे. 10 मे 2021 रोजी सक्रिय रुग्णांची सर्वोच्च संख्या गाठल्यापासून सक्रिय रुग्णसंख्या कमी होऊ लागली.
गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 76,755 रुग्णांची घट झाली असून देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत सक्रिय संख्या आता केवळ 8.50% आहे
दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सतत घसरण होत असून आतापर्यंत सलग बाराव्या दिवशी देशात दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी नोंद झाली.
गेल्या 24 तासात 1,86,364 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली.
भारतात बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांच्या तुलनेत सतत वाढत असून सलग 15 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक राहिली. गेल्या 24 तासात 2,59,459 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
गेल्या 24 तासात 73,095 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
महामारी सुरु झाल्यापासून कोविड-19 ने बाधित झालेल्यांपैकी आजपर्यंत 2,48,93,410 लोक बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासात 2,59,459 रुग्ण कोरोनातून बरे झाले. बरे होण्याचा एकूण दर 90.34% वर पोहचला आहे.
गेल्या 24 तासात देशात एकूण 20,70,508 चाचण्या करण्यात आल्या असून भारतात आतापर्यंत एकूण 33.90 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात एकीकडे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे साप्ताहिक रुग्ण पॉसिटिव्हीटीत सतत घट दिसून येत आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 10.42% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दरात घट होऊन तो आज 9.00% झाला आहे. हा दर आता सलग चौथ्या दिवशी 10% पेक्षा कमी राहिला आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या 20.57 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीच्या 20 कोटी मात्रा देऊन लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा गाठणारा भारत अमेरिकेनंतर दुसरा देश आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार, 29,38,367 सत्रांच्या माध्यमातून लसीच्या एकूण 20,57,20,660 मात्रा देण्यात आल्या आहेत.