Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 चा 9 सप्टेंबर रोजी प्रारंभ होणार

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 अंतर्गत देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावे समाविष्ट केली जातील

स्वच्छ भारत अभियान टप्पा -2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021 चा उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभ  करण्यात येणार आहे. ‘स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणने  समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वेक्षण 2021 च्या आयोजनाचे काम एका तज्ञ संस्थेला देण्यात आले आहे. सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून, गावे, जिल्हे आणि राज्ये यांना प्रमुख मापदंडांच्या आधारे क्रमवारीत स्थान दिले जाईल.

Image

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणचा भाग म्हणून, देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश केला जाईल. या गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, हाट/बाजार/धार्मिक स्थळे या 87,250 सार्वजनिक स्थळांना सर्वेक्षणासाठी भेट देण्यात येईल. सुमारे 1,74,750 कुटुंबांची स्वच्छ भारत अभियान संबंधित समस्यांवरील प्रतिसादासाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, यासाठी विकसित ऍप्लिकेशनचा वापर करून स्वच्छताविषयक समस्यांवर ऑनलाईन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना एकत्र आणले जाईल.

Image

पेयजल आणि स्वच्छता विभागाने (डीडीडब्ल्यूएस) “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (एसएसजी)- 2018 आणि 2019 यापूर्वी सुरू केले होते. एसएसजी केवळ क्रमवारी तयार करणे नाही तर जनआंदोलन (लोक चळवळ) तयार करण्यासाठी एक माध्यम आहे. प्रमुख गुणवत्ता आणि संख्यात्मक मापदंडांसंबंधित  त्यांच्या कामगिरीच्या आधारे जिल्ह्यांच्या क्रमवारीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक सविस्तर प्रोटोकॉल विकसित करण्यात आला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 च्या विविध घटकांचे मूल्यांकन खालीलप्रमाणे आहे:

 

Exit mobile version