फडणवीस यांचा बारामती पाहणी दौरा केला
केंद्र सरकार तर मदत देईलच, पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? जबाबदारी झटकून कसे चालेल? केवळ टोलवाटोलवी करू नका अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार काय करणार आहे ? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सोमवारी श्री. फडणवीस यांनी बारामती तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, राज्याचा नाकर्तेपणा समोर येत आहे. आमचा दौरा घोषित झाल्यावर सगळे पालक मंत्री जनतेच्या भेटीला गेले.शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. सरकारने प्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. राज्यपालांबरोबर यापूवीर्ही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नाही. शेतकऱ्याला काय मदत मिळणार ,असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. केंद्राची वाट न बघता राज्यानं मदत करावी,असा सल्ला देखील त्यांनी दिला.