Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

केंद्र सरकार शेतकर्‍यांना बियाण्याचे उच्च उत्पादन देणाऱ्या वाणाचे वाटप करणार

खाद्य तेलांमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने खरीप धोरण 2021 तयार केले

तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने बहुआयामी धोरण अवलंबले आहे. या धोरणानुसार, केंद्र सरकारने खरीप हंगाम 2021 साठी उच्च उत्पादन देणार्‍या बियाणांच्या वाणाचे मिनी-किटच्या रूपात मोफत वाटप करण्यासाठी महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे. विशेष खरीप कार्यक्रम तेलबिया अंतर्गत अतिरिक्त 6.37 लाख हेक्टर जमीन आणेल आणि 120.26 लाख क्विंटल तेलबिया व 24.36 लाख टन खाद्यतेल उत्पादित करण्याची शक्यता  आहे.

तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी बियाण्यांच्या उच्च उत्पादन देणार्‍या वाणांची उपलब्धता वाढवून तेलबियांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला. त्यानुसार एप्रिल 2021 मध्ये वेबिनारमध्ये राज्य सरकारांबरोबर आणि 30 एप्रिल 2021 रोजी खरीप परिषदेत विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या माध्यमातून सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र व उत्पादकता वाढवण्यासाठी योजना आखण्यात आल्या आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (तेल बियाणे आणि तेल पाम) अभियानांतर्गत उच्च उत्पादन देणारी वाण पुढीलप्रमाणे मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

 

तेलबिया आणि पामतेल वरील राष्ट्रीय अभियानाबद्दल

तेलबिया व पाम तेल वरील राष्ट्रीय अभियानाच्या  माध्यमातून केंद्र सरकारने खाद्य तेलांची उपलब्धता वाढवणे आणि तेलबिया व पामतेलाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवून खाद्य तेलांची आयात कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यासाठी बहुआयामी धोरण अवलंबले जात आहे.

Exit mobile version