कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरते एटीएम उपक्रम अधिक उपयुक्त ठरणार असून नागरिकांना आपल्या घराच्या जवळच एटीएम कारच्या माध्यमातून पैसे काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यासाठी एटीएमवर जाण्याची गरज नाही. त्यांना आपल्या घराजवळच या कारच्या माध्यमातून पैसे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात गर्दी नियंत्रणासाठी हे अधिक उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक येथील कार्यालयात एचडीएफसी बँकेच्या फिरत्या एटीएम कारचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, एचडीएफसी बँकेचे कर्मचारी सचिन भास्कर, राहुल देशपांडे, राजेंद्र आहेर, सचिन साखरे आदी उपस्थित होते.