राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता आॅफलाईन होणार आहेत. करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच ही परीक्षा घेण्यात येईल असे माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात संभ्रम होता. एका तथाकथीत तरुणाच्या चिथावणीमुळे अलिकडेच या विषयावर आंदोलनाचा प्रयत्नही झाला आहे. मात्र आता त्यानंतर परीक्षा मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमधील संभ्रम कमी होण्यास मदत होणार आहे.
आज महाराष्टÑ राज्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. दोन्ही परीक्षांचा निकाल एकाच वेळी लावण्याचे नियोजन आहे.
स्वतंत्र उपकेंद्राची घोषणा
ज्या ठिकाणी दहावी आणि बारावीच्या विदद्यार्थी संख्या 15 असेल, त्या ठिकाणी परीक्षेचे स्वतंत्र उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाचा धोका पूर्ण टळला नसल्याने ही काळजी घेण्यात येणार असून लहान शाळांमधील मुलांना आता या उपकेंद्रात परीक्षा देणे सोयीचे होणार आहे.
असे असेल वेळापत्रक
दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 22 ते 4 एप्रिल 22 या कालावधीत होणार आहे. तर 12वीची लेखी परीक्षा 4 ते 30 मार्च 22 या दरम्यान होणार आहे.