Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

टेलीमेडिसिन उपक्रमाने गाठला 1.2 कोटी सल्ल्यांचा टप्पा

दररोज सुमारे 90,000 रुग्ण ई संजीवनी या दूरस्थ आरोग्य सुविधेचा लाभ घेतात

ई संजीवनी या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने 1.2 कोटी (120लाख ) सल्ल्यांचा टप्पा गाठत देशाची सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी टेलीमेडिसिन सेवा म्हणून आकार घेतला आहे. सध्या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा देशभरात  दररोज 90,000 रुग्णांना सेवा पुरवत आहे. रुग्ण त्याच बरोबर डॉक्टर आणि तज्ञानी व्यापक रूपाने याचा स्वीकार केल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा ई संजीवनी, दोन प्रकारे चालते. ई संजीवनी एबी –एचडब्ल्यूसी ( डॉक्टर ते डॉक्टर यामधला टेलीमेडिसिन मंच ) आणि  ई संजीवनी ओपीडी ( रुग्ण ते   डॉक्टर यामधला टेलीमेडिसिन मंच ) बाह्य रुग्ण सेवा पुरवणारा हा मंच रुग्णांना त्यांच्या घरातच सल्ला सेवा पुरवतो.

डॉक्टर ते डॉक्टर टेलीमेडिसिन सेवा देणाऱ्या ई संजीवनीद्वारे सुमारे 67,00,000  सल्ले देण्यात आले आहेत. आयुष्मान भारत योजने अंतर्गत आरोग्य आणि वेलनेस केंद्रात याची अंमलबजावणी करण्यात येते. नोव्हेंबर 2019 मध्ये याची सुरवात झाली. ही सेवा सुरु करणारे आंध्रप्रदेश हे पहिले राज्य ठरले होते. ही सेवा सुरू झाल्यापासून विविध राज्यात 2000 केंद्रे आणि 28,000 प्रवक्ते आहेत.

ई संजीवनी ओपीडी ही नागरिकांना कोविड 19 आणि बिगर कोविड टेली मेडिसिन सेवा पुरवते. देशातल्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा सर्व बाह्य रुग्ण सेवा बंद होत्या त्या काळात  13 एप्रिल 2020 मध्ये याची सुरवात करण्यात आली. या सेवे द्वारे  51,00,000 रुग्णांना सेवा पुरवण्यात आली. 430 ऑनलाईन ओपीडी द्वारे या सेवा पुरवण्यात आल्या यामध्ये सर्वसाधारण ओपीडी आणि तज्ञ ओपीडी यांचा समावेश होता.

भटिंडा (पंजाब), बीबीनगर (तेलंगणा), कल्याणी (पश्चिम बंगाल), ऋषिकेश (उत्तराखंड), किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज, लखनऊ (उत्तर प्रदेश) इत्यादी एम्स सारख्या प्रमुख तृतीय स्तरीय वैद्यकीय संस्थाही ई संजीवनी ओपीडी द्वारे बाह्यरुग्ण आरोग्य सेवा प्रदान करत आहेत.

केंद्र सरकारची ई संजीवनी- ही राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा शहरी आणि ग्रामीण भारत यामधली डिजिटल आरोग्य तफावत दूर करण्यासाठी मदत करते. द्वितीय आणि तृतीय रुग्णालयावरचा ताण कमी करण्यासाठी मदत करण्याबरोबरच डॉक्टर आणि तज्ञ यांच्या संख्येतली कमतरता भरून काढण्यासाठी याचा उपयोग होतो. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या धर्तीवर हा  डिजिटल उपक्रमही देशातल्या डिजिटल आरोग्य परीसंस्थेला चालना देत आहे. मोहाली इथल्या सी डाक  या संस्थेने हे  स्वदेशी टेली मेडिसिन तंत्रज्ञान विकसित केले आहे. टेली मेडिसिनची उपयुक्तता आणि कोविद्ची आणखी लाट आल्यास त्यादृष्टीने नियोजन या दृष्टीने या उपक्रमात दिवसाला 500,000 सल्ले देण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्रालय यामध्ये  मध्ये वृद्धी करत  आहे. ई –संजीवनीचा स्वीकार करण्यात आघाडीवर असलेली10  राज्ये अशी आहेत-  (आंध्र प्रदेश (37,04,258), कर्नाटक (22,57,994), तामिळनाडू (15,62,156), उत्तर प्रदेश (13,28,889), गुजरात (4,60,326) , मध्य प्रदेश (4,28,544), बिहार (4,04,345), महाराष्ट्र (3,78,912), पश्चिम बंगाल (2,74,344), केरळ (2,60,654).

Exit mobile version