Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सोयाबीन काढणीनंतर पिकाची अशी घ्या काळजी

नांदेड  दि. 6 :- गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सतत येणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे व ज्यांची काढणी सुरू असून सोयाबिन काढणी नंतर सुरक्षित आणि उंच ठिकाणी ढिग करून ताडपत्री अथवा मेनकापड झाकुन ठेवावे अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्या आहे.
खोलगट किंवा सखल भागात सोयाबिन साठवून ठेवू नये.खराब आणि ओलसर असलेले सोयाबिन स्वतंत्र ठिकाणी ठेवावे.ऊन पडल्यास ते वाळवावे पुढील वर्षाच्या हंगामासाठी न भिजलेले चांगल्या दर्जाचे सोयाबिन मळणी करताना साठवून ठेवावे.या सोयाबिनची अधून मधून उगवन क्षमता तपासावी 70 टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवावे. उन्हाळी हंगामा मध्ये सोयाबीन 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधी मध्ये पेरणीकरून बिजोत्पादन करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
Exit mobile version