Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सुमित अंतीलने एफ-64 भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकले

टोक्यो इथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू सुमित अंतीलने आज भालाफेक एफ-64 क्रीडा प्रकारात पदार्पणातच सुवर्णपदक जिंकत, तीन जागतिक विक्रम रचले आहेत. या स्पर्धेत चार वेळा, इतर सर्व स्पर्धकांपेक्षा वरचढ कामगिरी करत सुमितने स्पर्धेवर सुरुवातीपासूनच वर्चस्व कायम राखले. पाचव्या प्रयत्नात 68.55 मीटर भालाफेक करत, त्याने विश्रविक्रमाची नोंद केली.

23 वर्षीय सुमित अंतील आधी कुस्तीपटू होता, मात्र, 2018 साली त्याने भालाफेक खेळाची निवड केली आणि 66.95 मीटरची भालाफेक करत, या क्रीडाप्रकरातील आपले नैपुण्य सिद्ध केले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 68.08 मीटर भालाफेक करत त्याने आपलूयाय कामगिरीत सुधारणा केली. त्याचा निकटचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बुरियनची सर्वोत्तम भालाफेक, 66.29 मीटरची होती आणि श्रीलंकेच्या दुलन कोडीथूवाक्कूने 65.61 मीटर भालाफेक करत कांस्यपदक जिंकले.

सुमित अंतीलचे प्रशिक्षण नवी दिल्लीतील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरु आहे. 2015 साली 17 वर्षांचा असतांना त्याला मोटारसायकल अपघात झाला, आणि त्यात त्याचा गुडघ्याखालचा डावा पाय गमवावा लागला होता.

यामुळे, त्याला कुस्तीपटू म्हणून आपले करियर करता आले नाही. मात्र नंतर कृत्रिम पाय बसवून त्याने क्रीडाक्षेत्रातून तीन वर्षांची रजा घेतली आणि आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.

भारताने, आज भालाफेकीत रौप्य आणि कांस्य पदकेही मिळवलीत. देवेन्द्र झाझरियाने  F46 भालाफेक प्रकारात 64.35 मीटर भालाफेक करत रौप्य आणि सुंदर सिंग गुर्जरने  64.01 मीटर भालाफेक करत, कांस्य पदक जिंकले.

त्यासोबतच, योगेश कथूनिया, याने F56 थाळीफेक प्रकारात रौप्य  आणि अवनी लेखराने एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. सर्व खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे आज एका दिवसांत भारताच्या खात्यात, दोन सुवर्णपदके, चार रौप्य पदके आणि एक कांस्य पदक जमा झाले आहे.

Exit mobile version