मी कविता हिरेश बेहरे, भाजीपाला स्टॉलधारक, ॲरोमा चौक सटाणा रोड, मालेगाव. पूर्वी मी मौजे कळवाडी इथं अभिनव इंग्लीश स्कुल या खाजगी संस्थेत गेल्या पाच वर्षापासून नोकरीला होते. परंतु स्वावंलबी व्हावं असं वाटल्यानं मी कृषी विभागामार्फत भाजीपाल्याचा स्टॉल घेतला. या नव्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्यानं काही दिवसांनी मी खाजगी संस्थेची नोकरी सोडून दिली.
आता पूर्णवेळ भाजीपाला विकते. या भाजीपाला विक्रीतून दिवसाला किमान दीडशे ते दोनशे किलो भाजीपाल्याची विक्री होते. त्यामुळं मिळालेल्या पैशातून आमच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं भागवित आहे. शेतकरी ते थेट ग्राहक ही योजना अतिशय उपयुक्त ठरत असून ग्राहकांनाही याचा फायदा होत आहे. या योजनेमुळं मला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं. ‘विकेल ते पिकेल’ योजनेतंर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याबरोबर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम शासनामार्फत राबविला जात आहे. याबद्दल मी शासनाचे आभार मानते.