Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे वाचवण्यात यश; सायबर चोरट्यास अटक

अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर विभागाने केले जेरबंद

मुंबई, दि. २० : ऑनलाईन पेटीएम अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर विभागाने जेरबंद केले. यामुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे वाचवण्यात यश आले असल्याची माहिती सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे.

यासंदर्भात दि. ०५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी  भागातील दुग्ध व्यावसायिक राजेश मनसुख पटेल यांनी महाराष्ट्र सायबरकडे तक्रार केली की, दि.२० ऑगस्ट २०२० आणि दि. २० सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या पेटीएम अकाउंट मधून त्यांचे अपरोक्ष ५० हजार ४४८ रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतले आहेत.

तक्रारीवरुन नोडल सायबर पोलीस ठाणे, महाराष्ट्र सायबर, येथे भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ४३ (अ),६६, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होतात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नोडल सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्याशी संबधित बाबींची तपासणी, अभ्यास करून तांत्रिक पद्धतीने तपास करत संशयीत आरोपी  MD, MUNNA उर्फ मोहम्मद मुन्ना, पाशिउद्दीन अन्सारी, वय २५ वर्षे, व्यवसाय – फिल्ड सेल्स एक्झिक्युटीव्ह, यास तात्काळ अटक करण्यात आले. आरोपीने इतरही व्यावसायिकांचे पेटीएम अकाऊंटचे पासवर्ड चोरून ते गैरकामासाठी वापरल्याचे पुढे येत आहे.

नागरिकांना आवाहन

नागरिकांना महाराष्ट्र सायबरतर्फे आवाहन करण्यात येते की, छोट्या व्यावसायिकाचे मर्चंट वॉलेट अकाऊंट उघडून देण्याच्या, तसेच त्यांचा पासवर्ड सेट करून देण्याचे बहाण्याने त्यांचा पासवर्ड स्वतःकडे घेऊन अशा मर्चंट वॉलेटचा वापर नंतर आर्थिक अपहाराकरिता करण्यात असल्याचे समोर आले आहे. सर्व लहान मोठ्या मर्चंट वॉलेटच्या ग्राहकांना सुचित करण्यात येते की, त्यांच्या मोबाईल क्रमांकांचे मर्चट वाँलेट खाते इतर कोणी वापरत नाही ना? याची खात्री करून आपला पासवर्ड स्वतः बदलून तो स्वत: पुरता मर्यादित ठेवावा व सतत बदलत राहावा.

कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक हरिश बैजल, पोलीस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपुत, पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर, पोलीस उप अधीक्षक  विजय खैरे, यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश सरदेसाई, सहा- पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, पो.हवा. विश्वास मोहिते, पो. शि. हर्षल रोकडे, शैलेश साळुंखे, पो. शि.निलेश जंगम, पो. शि. शाम हगवणे यांनी  केली आहे.

Exit mobile version