विशेष : सोयाबीनचे भाव घसरले, मात्र चिंता नको

कृषी पंढरी विशेष : 

औरंगाबाद, दि. 22 : दोन दिवसांपूर्वी लातूरच्या बाजारात सोयाबीनच्या  (soybean rate issue) भावात तब्बल तीन हजार रूपयांनी घसरण झाली आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला. जुलै महिन्यात दहा हजारावर गेलेले भाव दोन दिवसांपूर्वी साडेपाच हजारावर आले. त्यामुळे ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात भावाच्या घसरणीला सामोरे जावे लागते की काय? अशी चिंता शेतकºयांमध्ये दिसत आहे.

तथापि शेतकºयांचे सोयाबीन बाजारात आल्यानंतरही सोयाबीनचे (soybean import in India) भाव हे पाच हजार रूपये प्रति क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता कमी असून शेतकरी बांधवांनी त्यासंदर्भात काळजी करू नये असे आवाहन बाजारविषयक तज्ज्ञांनी केले आहे.

अलिकडेच केंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीनची आयात केली, तसेच सोयाबीन तेलावरील आयात शुल्कही घटवले. त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर होऊन त्यात घसरण झाली असा समज सध्या सगळीकडे होत आहे, त्यात काही अंशी तथ्य असले, तरी सध्याचे भाव हे फुगवलेले होते असा आरोप शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि व्यापाºयांवर केला आहे. सोयाबीन पेरणीच्या हंगामात भाव मुदद्दामहून वाढविले जातात. त्या अपेक्षेने जास्तीत जास्त शेतकरी कुठलाही विचार न करता सोयाबीन पेरणीकडे वळतात आणि काढणीचा हंगाम आला आणि शेतकºयाचे सोयाबीन बाजारात आले की भाव पाडले जातात असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

चुकीच्या वेळी झाली आयात

जुलै, आॅगस्टमध्ये देशातील पोल्ट्री उदद्योगाला सोयाबीनची आवश्यकता होती, मात्र त्यावेळेस सोयाबीन उपलब्ध न झाल्याने या उदद्योगावरही संकट आले आणि भाववाढही झाली. त्यामुळे शेतकºयासोबतच सर्वांचे नुकसान झाले. आताही जेव्हा गरज नाही, आणि जेव्हा देशातील शेतकºयांचे सोयाबीन बाजारात येणार आहे, तेव्हा आयात केल्याने त्याचा परिणाम नक्कीच आपल्या शेतकºयांवर होणार आहे. असे असले तरी सोयाबीन हे ग्लोबल कमोडिटी असल्याने आणि आपल्याकडील सोयाबीन हे जीएम नसलेले ( नॉन जीएम नसल्याने) त्याला आंतरराष्टÑीय बाजारात मागणी असल्याने, भविष्यात एक्स्पोर्ट होऊन सोयाबीनचे भाव वधारतील. सध्या जागतिक बाजारपेठेतील सोयाबीनचे भाव हे 5 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली नसून भविष्यातही त्यात घसरण होण्याची शक्यता नसल्याने सोयाबीनच्या भावात घसरण होणार असल्याची चिंता निरर्थक आहे. परिणामी शेतकºयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सोयाबीन मार्केट क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

दरम्यान दिनांक 20 सप्टेंबर रोजी लातूरच्या बाजारात 6200 रुपये (पोटलीला साडेपाच हजार) असा भाव होता, तर 18 सप्टेंबर रोजी हाच भाव 8 हजार 200 रुपये प्रति क्विंटल असा होता.