डिजिटल पेमेंटमध्ये युनिफाइड पेमेंट सिस्टम (UPI) ला मिळालेली लोकप्रियता लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने UPI वॉलेटसाठी प्रस्ताव दिला आहे. यासाठी UPI स्वतःचे वॉलेट सादर करणार आहे. याद्वारे आपण सहज पेमेंट करू शकतो. हे वॉलेट छोट्या रकमांचे पैसे देणार्या ग्राहकांना डोळ्यासमोर घेऊन तयार केले आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की यूपीआय पेमेंटमध्ये 50 टक्के वाट छोट्या रकमेचा आहे.
मात्र काही वेळा खराब इंटरनेटमुळे व्यवहार अयशस्वी होण्याची शक्यता असते. पण नव्या UPI वॉलेटमधून इंटरनेटशिवाय पेमेंट करणे शक्य होईल. याशिवाय UPI चे स्वतःचे वॉलेट असल्यास इतर कोणत्याही कंपनीचे वॉलेट वापरण्याची गरज भासणार नाही. आरबीआयचे म्हणणे आहे की UPI द्वारे लहान रकमेचे व्यवहार होत आहेत, यावरून लोक डिजिटल पेमेंटला गांभीर्याने घेत आहेत. त्यामुळे ही सुविधा अधिक सोयीस्कर बनवण्याची गरज आहे.
यांना होईल फायदा –
अल्प रकमेचे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडे पाहून रिझर्व्ह बँकेने हा प्रस्ताव दिला आहे. UPI पेमेंटपैकी 50% व्यवहार हे 200 रुपयांपेक्षा कमी आहेत. UPI मुळे, बँक खात्यातून थेट पेमेंट केल्याने बँक स्टेटमेंट खूप लांब आणि त्रासदायक बनते, मात्र UPI वॉलेटने असे होणार नाही.
कसे काम करेल वॉलेट-
हे इंटरनेटशिवाय देखील कार्य करेल. UPI अॅपमध्ये वॉलेटचा पर्याय असेल. वॉलेटमधील खात्यातून तुमच्या सोयीनुसार रक्कम टाकून तुम्ही पैसे भरू शकाल. यासह, आताच्या स्थितीप्रमाणे वारंवार खात्यातून पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. सध्या इतर कंपन्यांची वॉलेट वापरावी लागतात.