वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृदा विज्ञान संस्था शाखा परभणी, जालना व हिंगोली येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ डिसेंबर रोजी जागतिक मृद दिन साजरा करण्यात आला.
या निमित्त ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, मातीची सजिवता जपण्याकरिता जैव िवविधतेचे रक्षण यावर विभाग प्रमुख तथा मृदा शास्त्रज्ञ डॉ सय्यद ईस्माईल यांनी मार्गदर्शन केले. वेबिनार मध्ये दोनशे पेक्षा जास्त शेतकरी, विद्यार्थी, संशोधक व कृषि विस्तारक सहभागी झाले होते. मार्गदर्शनात डॉ सय्यद ईस्माईल म्हणाले की, पर्यावरणातील माती, जीव जंतु, वनस्पती व मानव यांचे परस्पर संबंध असुन कृषि उत्पादन वाढीत महत्वाची भुमिका आहे. माती हे संजीव घटक असुन ही संजीवता जपण्यासाठी जैव विविधतेत वृध्दी करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. जागतिक मृदा दिनानिमित्त मौजे नांदखेड येथील शेतक-याच्या बांधावर जैव विविधता आणि प्रयोग क्षेत्र भेट देऊन मृदा विज्ञान शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमात डॉ. अनिल धमक, डॉ आर एन खंदारे, डॉ एस पी झाडे, डॉ जावळे, डॉ शीलेवंत, तोडमल, इंगोले, बगमारे आदी सहभाग घेतला.