Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पॅकेजिंगमध्ये करता येईल स्मार्ट करियर

आजच्या स्मार्ट काळात एखाद्या वस्तुची गुणवत्ता आणि दर्जा महत्वाची असतेच. त्याशिवाय त्या वस्तुचे आकर्षक पॅकिंग सुध्दा तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे पॅकेजिंगकडे अधिकाधिक लक्ष दिले जाते. आपल्या देशातील विविध वस्तुंच्या बाजारपेठेचा आकार बघता पॅकेजिंग क्षेत्राचे महत्व लक्षात यावे.

असे आहेत अभ्यासक्रम :
या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिंना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याअनुषंगाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेने सुरु केलेले विविध अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. त्याअनुषंगाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेने सुरु केलेले विविध अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात.

पॅकेजिंग हे शास्त्र असून त्यातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता दिसून येते. ही बाब लक्षात घेऊनच पॅकेजिंग विषयाशी निगडित अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. यातील काही अभ्यासक्रम हे दीर्घ कालावधीचे आहेत. तर काही अभ्यासक्र लघु मुदतीचे आहे. या लघुमुदतीच्या अभ्यासक्रमात सर्टिफिकेट अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी :
या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने. हा अभ्यासक्रम विशेषत: निर्यातयोग्य मालाच्या सुयोग्य अशा पॅकेजिंगसाठी उपयुक्त ठरणारा आहे. १९६९ सालापासून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम मुंबई, दिल्ली, कोलकता ,हैदराबाद, चेन्नई येथे करता येतो. एकाच वेळी 15 ते 25 उमेदवारांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम सप्टेबर ते डिसेंबर या कालावधीत आयोजित केला जातो. कोणत्याही शाखेतील 12 वी, आयटीआय, पदवीधर किंवा पदविकाधारकांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संस्थेमार्फत प्रमाणपत्र दिले जाते. उमेदवारांना पॅकेजिंगच्या अनुषंगाने तांत्रिक, शास्त्रीय आणि कलात्मक ज्ञान प्रदान केले जाते. पॅकेजिंग सहित्याची सुरक्षिता, किमती याविषयीसुध्दा प्रशिक्षण दिले जाते.

पोस्ट ग्रज्यूएट डिप्लोमा इन पॅकेजिंग:
गेल्या २५ वर्षांपासून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. अर्हता- अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी जून महिन्यात चाळणी परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यात होतो. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, दिल्ली, कोलकता आणि हैदराबाद कॅम्पस मध्ये करता येतो. हा अभ्यासक्रम चार सत्रांचा आहे. यापैकी तीन सत्रांचा अभ्यासक्रम कॅम्पसमध्ये शिकवला जातो. चौथ्या सत्रामध्ये वेगवेगळया पॅकेजिंग उद्योगामध्ये प्रत्यक्ष काम करावे लागते.

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पॅकेजिंग उद्योगात गुणवत्ता परीक्षण आणि मूल्यमापन, निर्मिती, विक्री आणि विपणन, डिझायनिंग अशा सारख्या क्षेत्रात करीअरच्या संधी मिळतात. हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे सध्या उच्च पदांवर कार्यरत आहे.
पत्ता- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट इ-2, रस्ता क्रमांक 8, एमआयडीसी एरिया,पोस्ट बॉक्स- 9432,अंधेरी पूर्व, मुंबई-400093, दूरध्वनी- 022-2821 9803, फॅक्स- 2832 8178, संकेतस्थळ- http://www.iip-in.com, ईमेल- – iip@iip-in.com

Exit mobile version