यंदा कृषी उत्पादनांच्या विक्रीत 700ते 900 टक्के वाढ

दिवाळीमध्ये खादी आणि इतर ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत विक्रमी वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाला आणि ‘व्होकल फॉर लोकल’ आवाहनाला आणि समाज माध्यमातून होत असलेल्या प्रचाराला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे एमएसएमई अर्थात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या दिवाळीमध्ये खादी, ग्रामोद्योग आणि स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची विक्रमी विक्री झाल्याचे दिसून आले आहे.

दिवाळी सणापूर्वी एमएसएमई मंत्रालयाच्यावतीने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी अतिशय नाविन्यपूर्ण, आकर्षक आणि आक्रमक जाहिरात समाज माध्यमाव्दारे केली. ‘‘उजाले इन उमीदों के’’ या दृकश्राव्य जाहिरातीचा चांगला प्रभाव पडला, त्यामुळे यामध्ये समाविष्ट झालेल्या सुमारे डझनभर स्थानिक उत्पादनांची माहिती देणारे संदेश सर्वदूर पोहोचले. परिणामी या उत्पादनांविषयी ग्राहकांच्या मनात उत्सुकता निर्माण होऊन खरेदी करण्यास उद्युक्त झाले.

गेल्यावर्षीच्या म्हणजे 2019च्या दिवाळीच्या तुलनेत यंदा खादी विक्रीमध्ये जवळपास 300 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात असलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या विक्री केंद्रातून सर्वसाधारणपणे पाच कोटी रुपयांपासून ते 21 कोटी रुपयांपर्यंत विक्रीवाढ झाल्याचे दिसून आहे. सामान्यपणे चौपट विक्रीवाढ नोंदविली आहे. विशेष म्हणजे खादी, अगरबत्ती, मेणबत्त्या, दिवे, मध, धातूकला उत्पादने, काचेच्या वस्तू, याशिवाय चरखा पेटी, कृषी आणि अन्न पदार्थ, सुती आणि रेशमी कापड, कपडे, लोकरीचे कपडे, कलाकुसर, भरतकाम केलेले कपडे यांचा यामध्ये समावेश आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या खादी ग्रामोद्योग भवनामध्ये सन 2020 आणि सन 2019 यांच्या मध्ये झालेली खरेदीची आकडेवारी-

Sale During Diwali Festival (In Lakhs)
Sr. no. Item 14-10-19 to 27-10-19 1-11-20 to 14-11-20 Growth
1 Metal Art Products 3.34 4.14 24%
2 Glass Articles Incl.

Charkha In Box

0.01 0.34 3300%
3 Other Village Industry  Items 76.33 309.93 306%
4 Fabric Cotton 82.98 724.18 773%
5 Fabric Poly 8.23 23.23 182%
6 Fabric Silk 123.28 364.64 196%
7 Fabric Woolen 42.2 105.1 149%
8 Embroidery Products 1.59 3.37 112%
9 Readymade Incl. Khadi Mask 192.75 458.26 138%
            Agro Products
10 Honey 6.99 21.24 204%
11 Papad 1.93 20.17 943%
12 Pickle 1.71 17.60 928%
13 Masala 1.29 12.28 849%
14 Hing 0.97 10.49 986%
Total 544 2,075 282%

नवी दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस खादी इंडियाच्या दुकानातून प्रतिदिन सरासरी 1.27 कोटींची विक्र झाली. खादी वस्तू विक्रीच्या या विक्रमाने एक इतिहास निर्माण केला आहे. गांधी जयंतीदिनी जाहीर झालेल्या सवलतीनंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात या दुकानांतून चार वेळा एक कोटींपेक्षा जास्त मालाची विक्री एकाच दिवशी झाल्याचे दिसून आले आहे.

 

यावर्षी खादी इंडिया कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली दुकानातून प्रतिदिनी झालेल्या विक्रीची माहिती –

  • 2 ऑक्टोबर,2020 – रु. 102.24 लाख
  • 24 ऑक्टोबर,2020 – रू. 105.62 लाख
  • 7 नोव्हेंबर,2020 – रू. 106.18 लाख
  • 13 नोव्हेंबर 2020 – रु. 111.40 लाख

वास्तविक यंदा झालेला कोविड महामारीचा उद्रेक आणि त्यामुळे आलेल्या मर्यादा लक्षात घेता खादीची कमी विक्री होईल, असा अंदाज होता, मात्र एमएसएमई आणि खादी ग्रामोद्योग यांनी सातत्याने नवनवीन उपक्रम सुरू ठेवल्यामुळे या उत्पादनांचा प्रसार सर्वत्र झाला. तसेच कोविडमध्ये आवश्यक असलेले सॅनिटायझर्स, मास्क, या सारख्या उत्पादनांची निर्मिती करून त्यांच्या गुणवत्तेची माहिती सर्वत्र प्रसारित केल्यामुळे खादी वस्तूंना मागणी वाढल्याचे दिसून आले.

पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल या मोहिमांना दिलेल्या प्रोत्साहनाचा लाभ आता दिसून येत आहे.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहेत. यामध्ये सहा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचे हे एक प्रचंड जाळे आहे. या दिवाळीमध्ये स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना लोकांनी खूप उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. त्यामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये एमएसएमईची महत्वाची भूमिका पुन्हा निर्माण झाली आहे. या लहान व्यावयायिकांसाठी ई-विपणन, निर्यात तसेच डिजिटायझेशन अशा विविध सुविधा निर्माण करण्यासाठी एमएसएमई वचनबद्ध असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.