Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गीर गायीच्या धर्तीवर राज्यात सानेन शेळी आणणार

दुग्ध व्यवसाय विकासमंत्री  सुनिल केदार

मुंबई, दि. 11 : भारतातील गीर गाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवलक्रांती घडवून आणली. ब्राझीलमध्ये ही जात आज सर्वोच्च उत्पादन देणारी बनली आहे. याच धर्तीवर राज्यात 12 लीटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधन करून क्रांतिकारी वाटचाल करण्याचा मानस असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री.केदार म्हणाले, दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. यासाठी शेळी संवर्धनावर भर देण्यात येत आहे. कॅनडामध्ये सानेन नावाच्या शेळीची एक नवीन विकसित जात आहे. ही शेळी दिवसाला १२ लिटर दूध देते. अशी शेळी जर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिली तर आपल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलून जाईल. याकरीता राज्यात काही भागात लवकरच हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे  श्री. केदार यांनी सांगितले.

Exit mobile version