Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

या मार्गांवर चालते किसान रेल सेवा

7 ऑगस्ट 2020 रोजी पहिली किसान रेल सेवा सुरू झाल्यापासून 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतीय रेल्वेने 208 किसान रेल चालवल्या असून फळे आणि भाजीपाल्यांसह अंदाजे 68 हजार टन नाशिवंत मालाची वाहतूक केली आहे.

तथापि, नाशिवंत मालाचा साठा करण्यासाठी नाशिक, सिंगूर, नवीन आझादपूर, राजा का तालाब/वाराणसी, गाझीपूर आणि फतुहा येथे तापमान नियंत्रित  कार्गो केंद्रे सुरू केली गेली आहेत. याव्यतिरिक्त, दादरी मधील इनलँड कंटेनर डेपो येथे कोल्ड स्टोरेज रेफर पार्क विकसित केले गेले असून, सोनीपत मधील राय येथे शीतगृह साठवण सुविधा सुरू केली आहे.

किसान रेल प्रकल्पांतर्गत रेल्वेने आतापर्यंत खालील मार्गांवर किसान रेल सेवा चालविली आहे.

  1. देवळाली / सांगोला (महाराष्ट्र) ते दानापुर / मुझफ्फरपूर (बिहार)
  2. अनंतपूर (आंध्र प्रदेश) ते आदर्श नगर (दिल्ली)
  3. यशवंतपूर (कर्नाटक) ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली)
  4. वरुड / नागपूर (महाराष्ट्र) ते आदर्श नगर (दिल्ली)
  5. छिंदवाडा (मध्य प्रदेश) ते हावडा (पश्चिम बंगाल)
  6. सांगोला (महाराष्ट्र) ते हावडा (पश्चिम बंगाल)
  7. सांगोला (महाराष्ट्र) ते शालीमार (पश्चिम बंगाल)
  8. इंदूर (मध्य प्रदेश) ते न्यू गुवाहाटी (आसाम)
  9. रतलाम (मध्य प्रदेश) ते न्यू गुवाहाटी (आसाम)
  10. इंदूर (मध्य प्रदेश) ते अगरतला (त्रिपुरा)
  11. जालंधर (पंजाब) ते झिरानिया (त्रिपुरा)
  12. नगरसोल (महाराष्ट्र) ते न्यू गुवाहाटी (आसाम)
  13. नगरसोल (महाराष्ट्र) ते चितपूर (पश्चिम बंगाल)
  14. नगरसोल (महाराष्ट्र) ते न्यू जलपाईगुडी (पश्चिम बंगाल)
  15. नगरसोल (महाराष्ट्र) ते नौगाचिया (बिहार)
  16. नगरसोल (महाराष्ट्र) ते फतुहा (बिहार)
  17. नगरसोल (महाराष्ट्र) ते बैहाटा (आसाम)
  18. नगरसोल (महाराष्ट्र) ते मालदा टाउन (पश्चिम बंगाल)
  19. डहाणू रोड (महाराष्ट्र) ते आदर्श नगर (दिल्ली)
  20. तारकेश्वर (पश्चिम बंगाल) ते दिमापुर (नागालँड)
  21. नगरसोल (महाराष्ट्र) ते अगरतला (त्रिपुरा)
  22. धोराजी (गुजरात) ते न्यू गुवाहाटी (आसाम)
  23. नगरसोल (महाराष्ट्र) ते धुपगुरी (पश्चिम बंगाल); आणि
  24. नगरसोल (महाराष्ट्र) ते गोर मालदा (पश्चिम बंगाल)

ही माहिती रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

Exit mobile version