नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि दिंडोरी तालुक्यात काही भागात आज दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले. तर एकही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पाणी शिरले होते.

दुपारी २ ते ५ दरम्यान परतीच्या वडनेरसह  आणि दिंडोरी तालुक्यातील काही गावात परिसरात  पावसाने अक्षरशः  हैदोस घातला. परिसरातील नद्या नाल्यांना पूर आले होते. द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.छाटणी झालेल्या द्राक्ष बागांना रात्री उशिरा पर्यत द्राक्ष उत्पादक फवारणी करत असतांना  साचलेल्या पाण्यामुळे फवारणीत मोठे अडथळे निर्माण झाले होते.

शेतकऱ्याच्या  घरात पावसाचे पाणी घुसल्याने त्यांच्या कुटुंबियांना रात्र जागून काढावी लागली. रस्ताचे काम करतांना चूक केल्यानेच हि परिस्थिती ओढल्याचे मोगल यांनी सांगितले आहे.

दिंडोरी तालुक्यातील सीमेवर असलेल्या शिंदवड परिसरात काढणीला आलेले सोयाबीन,भुईमुग पिकामधून पाणी वाहत असल्यामुळे हे पिके संकटात असून सडण्यांची भिती निर्माण झाली आहे. त्यांच प्रमाणे परिसरातील द्राक्ष बागा पोंगाअवस्थेत असल्यामुळे जिरण्याची भिती निर्माण झाली आहे.  तसेच पोंगा अवस्थेत डावणी रोगाची लागण होत असल्यामुळे छाटणी केलेल्या द्राक्षबागा धोक्यात आल्या आहे त्याच प्रमाणे टोमटो पिकाचे नुकसान झाले आहे सलग दोन वेळा शिंदवड परिसरामध्ये ढग फुटी सारखा पाऊस पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.