देशभरात गेल्या 24 तासात 76,58,203 कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मात्रा देण्यात आल्याने, आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 118.44 (1,18,44,23,573) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.
1,22,71,257 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
HCWs | 1st Dose | 1,03,82,725 |
2nd Dose | 94,26,512 | |
FLWs |
1st Dose | 1,83,76,833 |
2nd Dose | 1,63,60,597 | |
Age Group 18-44 years |
1st Dose | 44,66,37,552 |
2nd Dose | 19,89,48,841 | |
Age Group 45-59 years |
1st Dose | 18,17,64,052 |
2nd Dose | 11,33,02,934 | |
Over 60 years |
1st Dose | 11,38,31,778 |
2nd Dose | 7,53,91,749 | |
Total | 1,18,44,23,573 |
गेल्या 24 तासात 10,949 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत(महामारीच्या आरंभापासून)कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,39,57,698 इतकी झाली आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.33% झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 150दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम राहिला आहे.
गेल्या 24 तासात 9,283 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,11,481 आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.32% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
गेल्या 24 तासामध्ये एकूण 11,57,697 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 63.47 (63,47,74,225) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.93% असून गेल्या 61 दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.80% असून गेले 51 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 86 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.