गेल्या 24 तासात 71,365 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 96.70%

गेल्या 24 तासात 53.61 (53,61,099) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 170.87 (1,70,87,06,705) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,90,41,308 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,98,181
2nd Dose 1,00,05,351
Precaution Dose 37,23,616
FLWs 1st Dose 1,84,02,946
2nd Dose 1,75,95,829
Precaution Dose 49,60,626
Age Group 15-18 years 1st Dose 5,04,94,313
2nd Dose 92,19,707
Age Group 18-44 years 1st Dose 54,60,68,719
2nd Dose 41,97,38,863
Age Group 45-59 years 1st Dose 20,12,29,449
2nd Dose 17,48,33,878
Over 60 years 1st Dose 12,55,71,357
2nd Dose 10,94,31,875
Precaution Dose 70,31,995
Precaution Dose 1,57,16,237
Total 1,70,87,06,705

 

गेल्या 24 तासात 1,72,211 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,10,12,869 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 96.70% झाला आहे.

गेल्या 24 तासात 71,365 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 8,92,828 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 2.11% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 15,71,726 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 74.46 (74,46,84,750) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 7.57% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.54% आहे.