गेल्या 24 तासात 46,164 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोविड-19 विषयी अद्ययावत माहिती

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 60.38 कोटी मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासात 46,164 नव्या रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णासंख्येच्या 1.03 %

भारतातली उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,33,725

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.63%

गेल्या 24 तासात 34,159  रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,17,88,440

साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (2.02%),सलग  62 दिवस 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर (2.58%),गेले 31 दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत 51.31 कोटी एकूण चाचण्या करण्यात आल्या.

ज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 58 कोटी 76 लाखांहून अधिक मात्रा पुरवण्यात आल्या

देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढवणे आणि मोहिमेची व्याप्ती विस्तारण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसीच्या अधिक मात्रा उपलब्ध करून देणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करता यावे यासाठी त्यांच्याकरिता उपलब्ध असलेल्या लसीच्या मात्रांची आगाऊ स्वरुपात माहिती पुरविणे आणि लस पुरवठा साखळी सुरळीत ठेवून लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात येत आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा करून त्यांना मदत करत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस उत्पादकांनी उत्पादित केलेल्या लसीच्या साठ्यापैकी 75% साठ्याची खरेदी करून त्याचा (मोफत) पुरवठा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करत आहे.

VACCINE DOSES  

(As on 26 August 2021)

 

SUPPLIED

 

58,76,56,410

 

PIPELINE

 

1,03,39,970

 

BALANCE AVAILABLE

 

3,77,09,391

केंद्र सरकारकडून (मोफत पुरवठा मार्गाने) आणि राज्यांकडून थेट खरेदीच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 58 कोटी 76 लाखांहून अधिक (58,76,56,410) मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे आणि आणखी 1,03,39,970 मात्रांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 3 कोटी 77 लाखांहून अधिक (3,77,09,391) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.