गेल्या 24 तासात 35,662 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या (3,40,639) एकूण रुग्णसंख्येच्या 1.02%

गेल्या 24 तासात आतापर्यंचे एका दिवसातले सर्वोच्च 2.5 कोटी मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 79 (79,42,87,699) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात दिलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या 2.15 कोटी मात्रा तर राज्यांनींही दिलेल्या आकडेवारीनुसार 2.5 कोटी मात्रांचे लसीकरण झाले. 78,49,738 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत. दैनंदिन लसीकरणाची आकडेवारी अंतिम अहवाल आल्यानंतर आजसाठी अद्यावत केली जाईल.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

 

HCWs

1st Dose 1,03,67,858
2nd Dose 86,96,165
 

FLWs

1st Dose 1,83,43,570
2nd Dose 1,44,00,387
 

Age Group 18-44 years

1st Dose 32,12,63,332
2nd Dose 5,62,22,452
 

Age Group 45-59 years

1st Dose 14,93,59,311
2nd Dose 6,77,70,267
 

Over 60 years

1st Dose 9,61,06,803
2nd Dose 5,17,57,554
Total 79,42,87,699

 

या दिमाखदार यशाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशाचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटर संदेशात ते म्हणाले की

“प्रत्येक भारतीयाला आजच्या विक्रमी लसीकरणावर गर्व  होईल”.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002HVFX.png

केन्द्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडवीय यांनीही आजच्या विक्रमी यशाबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी हे यश देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना समर्पित केले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0033DMW.png

गेल्या 24 तासांत 33,798 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,26,32,222 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.65% झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0046DSX.jpg

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 83 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 35,662 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005D4W2.jpg

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,40,639 असून आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.02% आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0069PUH.jpg

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 14,48,833 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 55.07 (55,07,80,273) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.02% असून गेल्या 85 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.46% असून गेले सलग 19 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 102 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007AB1V.jpg