गेल्या 24 तासात 2,876 नवीन रुग्णांची नोंद

भारतातील कोविडची उपचाराधीन रुग्णसंख्या आज 32,811 इतकी कमी झाली असून, देशातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.08% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72%

रुग्णसंख्या कमी होण्याचा कल कायम राहिल्याने भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या 32,811 इतकी कमी झाली आहे. सध्याची उपचाराधीन रुग्णसंख्या ही देशाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत 0.08% आहे.

परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.72% वर पोहोचला आहे.  गेल्या 24 तासांत 3,884 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, (देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,50,055 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,876  नवीन रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासांत देशात एकूण 7,52,818 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 5 लाखांहून अधिक (78,05,06,974) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात  दैनंदिन आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 0.44% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.38%.इतका आहे.

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार भारताच्या देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 180 कोटी 60 लाखांहून अधिक  (1,80,60,93,107) लसमात्रांचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,11,93,183 सत्रांतून हे उद्दिष्ट साध्य केले आले

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,02,794
2nd Dose 99,87,279
Precaution Dose 43,32,071
FLWs 1st Dose 1,84,11,792
2nd Dose 1,74,82,386
Precaution Dose 66,02,146
Age Group 15-18 years 1st Dose 5,60,41,282
2nd Dose 3,47,40,004
Age Group 18-44 years 1st Dose 55,35,60,174
2nd Dose 45,74,25,030
Age Group 45-59 years 1st Dose 20,25,71,402
2nd Dose 18,32,54,385
Over 60 years 1st Dose 12,66,16,352
2nd Dose 11,41,35,545
Precaution Dose 1,05,30,465
Precaution Dose 2,14,64,682
Total 1,80,60,93,107