Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात 22,775 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.32%

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालांनुसार भारतातील कोविड-19 लसीकरणाने गेल्या 24 तासांत लसीच्या 58,11,487 मात्रा देऊन,एकूण 145 कोटी 16 लाख(1,45,16,24,150) मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.1,55,02,407 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

 

 

HCWs

1st Dose 1,03,87,911
2nd Dose 97,14,208
 

FLWs

1st Dose 1,83,85,748
2nd Dose 1,69,00,338
 

Age Group 18-44 years

1st Dose 49,99,80,567
2nd Dose 33,37,90,836
 

Age Group 45-59 years

1st Dose 19,46,34,482
2nd Dose 15,09,65,213
 

Over 60 years

1st Dose 12,14,69,025
2nd Dose 9,53,95,822
Total 1,45,16,24,150

 

गेल्या 24 तासांत 8,949 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्येत (महामारीच्या आरंभापासून ) वाढ होऊन ती संख्या 3,42,75,312 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.32% इतका आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 187 दिवसांपासून दररोज 50,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.

गेल्या 24 तासात 22,775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 1,04,781 आहे.देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.30% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 11,10,855 चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण 67.89 कोटींपेक्षा जास्त (67,89,89,110) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.10% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.05%इतका नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version