रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 23,913 इतकी कमी
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 181.56 (1,81,56,01,944) कोटी लसींच्या मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,14,38,677 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 34 लाखापेक्षा जास्त (34,19,633) कोविड प्रतिबंधक लसमात्रा दिल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 10403113 |
2nd Dose | 9991704 | |
Precaution Dose | 4369373 | |
FLWs | 1st Dose | 18412260 |
2nd Dose | 17490858 | |
Precaution Dose | 6684262 | |
Age Group 12-14 years | 1st Dose | 3419633 |
Age Group 15-18 years | 1st Dose | 56294499 |
2nd Dose | 35814910 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 553873437 |
2nd Dose | 460202340 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 202626402 |
2nd Dose | 183959784 | |
Over 60 years | 1st Dose | 126652374 |
2nd Dose | 114583223 | |
Precaution Dose | 10823772 | |
Precaution Dose | 2,18,77,407 | |
Total | 1,81,56,01,944 |
देशात कोविड रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. सध्या ती 23,913 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे.
परिणामी, देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे.
गेल्या 24 तासांत 2,741 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,70,515 झाली आहे.
गेल्या 24 तासात देशभरात 1,581 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 5,68,471 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 78.36 (78,36,13,628) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.39% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.28% आहे.