रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.46%
गेल्या 24 तासात 30.49 (30,49,988) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 176.52 (1,76,52,31,385) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,01,49,530 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,04,01,131 |
2nd Dose | 99,60,537 | |
Precaution Dose | 41,13,480 | |
FLWs | 1st Dose | 1,84,08,724 |
2nd Dose | 1,74,30,375 | |
Precaution Dose | 60,92,569 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 5,42,63,490 |
2nd Dose | 2,47,48,744 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 55,10,97,609 |
2nd Dose | 43,99,93,963 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 20,21,57,669 |
2nd Dose | 17,92,34,856 | |
Over 60 years | 1st Dose | 12,63,13,709 |
2nd Dose | 11,16,53,849 | |
Precaution Dose | 93,60,680 | |
Precaution Dose | 1,95,66,729 | |
Total | 1,76,52,31,385 |
गेल्या 24 तासात 30,009 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,22,19,896.झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.46% झाला आहे.
गेल्या 24 तासात 14,148 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,48,359 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.35%आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,55,147 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 76.35 (76,35,69,165) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.60% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.22% आहे.