Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात 12,514 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपर्यंत लसीच्या 106.31 कोटी मात्रा देण्यात आल्या

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 12,77,542 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 106.31 कोटी  (1,06,31,24,205 ) चा    टप्पा  पार केला  आहे. देशभरात  1,06,32,634 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

 

HCWs

1st Dose 1,03,79,141
2nd Dose 92,24,881
 

FLWs

1st Dose 1,83,71,702
2nd Dose 1,59,33,598
 

Age Group 18-44 years

1st Dose 41,89,13,774
2nd Dose 14,24,08,610
 

Age Group 45-59 years

1st Dose 17,49,26,935
2nd Dose 9,64,66,823
 

Over 60 years

1st Dose 10,97,79,956
2nd Dose 6,67,18,785
Total 1,06,31,24,205

 

गेल्या 24 तासांत 12,718 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,36,68,560  झाली आहे.

परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 98.20% आहे

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 127 दिवस  नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत,देशभरात  12,514 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 1,58,817 इतकी आहे आणि ही गेल्या  248 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.46% आहे  जे  मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 8,81,379  चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 60 कोटी  92 लाखांहून अधिक (60,92,01,294) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.17 टक्के असून गेले 38 दिवस हा दर 2% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.42 % इतका आहेदैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 28 दिवस 2% हून कमी आहे आणि आता गेले सलग   63 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे.

Exit mobile version