Covid-19 : गेल्या 24 तासात 3,993 नव्या रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 49,948

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात लसीच्या 21.34 लाखांहून अधिक (21,34,463) मात्रा देणे पूर्ण करत भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 179.13 कोटी (1,79,13,41,295) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

एकूण 2,08,07,099 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,02,230
2nd Dose 99,77,592
Precaution Dose 42,58,154
FLWs 1st Dose 1,84,10,719
2nd Dose 1,74,63,730
Precaution Dose 64,26,046
Age Group 15-18 years 1st Dose 5,54,96,520
2nd Dose 3,15,16,231
Age Group 18-44 years 1st Dose 55,27,40,302
2nd Dose 45,08,05,644
Age Group 45-59 years 1st Dose 20,24,31,362
2nd Dose 18,16,66,469
Over 60 years 1st Dose 12,65,28,642
2nd Dose 11,31,35,305
Precaution Dose 1,00,82,349
Precaution Dose 2,07,66,549
Total 1,79,13,41,295

 

गेल्या 24 तासात 8,055 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,24,06,150 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.68% इतका आहे.

गेल्या 24 तासात 3,993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 49,948 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.12% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 8,73,395 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77.43 कोटींपेक्षा जास्त (77,43,10,567) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.68% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.46%. नोंदविण्यात आला आहे