देशात 10,197 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 113 कोटी 68 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 67,82,042 मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 113 कोटी 68 लाखांचा (1,13,68, 79,685) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,13,73,459 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

कोविड प्रतिबंधक लसीच्या ज्या एकूण मात्रा दिल्या गेल्या आहेत त्यांची आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे:

 

HCWs 1st Dose 1,03,80,957
2nd Dose 93,53,906
 

FLWs

1st Dose 1,83,74,594
2nd Dose 1,62,19,699
 

Age Group 18-44 years

1st Dose 43,57,31,810
2nd Dose 17,67,65,054
 

Age Group 45-59 years

1st Dose 17,90,55,132
2nd Dose 10,67,80,250
 

Over 60 years

1st Dose 11,21,81,588
2nd Dose 7,20,36,695
Total 1,13,68,79,685

 

गेल्या 24 तासांत 12,134 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,38,73,890 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 98.28% आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग 143 दिवस, 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत, 10,197 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 1,28,555  इतकी आहे, गेल्या 527 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.37

% असून मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,42,177 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 62 कोटी 70 लाखांहून अधिक (62,70,16,336) चाचण्या करण्यात आल्या.

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.96% असून गेले 54 दिवस हा दर 2%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 0.82% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 44 दिवस 2% हून कमी आणि गेले सलग 79 दिवस 3% हून कमी राहिला आहे.