Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासांत 40,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद

देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या 4,82,071 इतकी खाली आली आहे आणि सक्रीय रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.58%आहे

भारतात गेल्या 24 तासांत 40,000 पेक्षा(39,756) कमी दैनंदिन नव्या  रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

सलग  आठ दिवस  50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 

देशात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सतत घसरण होत आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या आज 4,82,071  इतकी आहे.

गेल्या 24 तासांत एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत 3,279 ची घट नोंदली गेली आणि देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण केवळ 1.58 % इतके आहेत.

भारताच्या एकूण लसीकरणाने काल 35 .28 कोटींचा महत्वपूर्ण  टप्पा गाठला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 46,34,986  सत्रांद्वारे 35,28,92,046 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत लसींच्या 14,81,583 मात्रा देण्यात आल्या.

त्या पुढील प्रमाणे:

 

HCWs 1st Dose 1,02,29,388
2nd Dose 73,13,234
FLWs 1st Dose 1,75,86,200
2nd Dose 96,69,322
Age Group 18-44 years 1st Dose 10,07,24,211
2nd Dose 27,77,265
Age Group 45-59 years 1st Dose 9,07,90,116
2nd Dose 1,89,54,073
Over 60 years 1st Dose 6,89,93,767
2nd Dose 2,58,54,470
Total 35,28,92,046

कोविड 19 लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा 21 जून 2021 पासून सुरू झाला. केंद्र सरकार देशभरात कोविड-19 लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

कोविड -19 संसर्गातून मोठ्या संख्येने लोक बरे होत आहेत. भारतातील बरे झालेल्यांची दैनंदिन संख्या सलग 53 व्या  दिवशी नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. गेल्या 24 तासांत 42,352 रुग्ण बरे झाले आहेत.

 

दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 2,000 (2,556) पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.

महामारीच्या सुरुवातीपासून संसर्ग झालेल्या लोकांपैकी 2,97,00,430 रुग्ण कोविड -19 संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत, 42,352 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97.11% आहे, जो सतत वाढता कल दर्शवत आहे.

संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत देशातील एकूण 15,22,504 चाचण्या घेण्यात आल्या. एकत्रितरित्या, भारताने आतापर्यंत 41.97 कोटी (41,97,77,457) पेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात एकीकडे चाचणी क्षमता वाढवण्यात आली आहे, तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरातनिरंतर घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 2.40% वर आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हीटीदर आज 2.61% आहे. सलग 28 व्या  दिवशी दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी राहिला आहे.

 

Exit mobile version