Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

विक्रमी 1095.38 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या

सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी शक्य- कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

चालू खरीप हंगामात विक्रमी 1095.38 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. भाताची पेरणी अद्याप सुरु असून दली डाळी, भरड धान्य, बाजरी, तेलबिया यांची पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. आतापर्यंत खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्राच्या प्रगतीवर कोविड-19 चा परिणाम झालेला नाही.

सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने महामारीमुळे लागू झालेल्या  लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी शक्य झाल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. सरकारच्या योजना आणि मिशन कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारांचे  सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. वेळेवर कृती, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे श्रेय त्यांनी शेतकऱ्याना दिले. खरीप हंगामाच्या पेरणीसाठीची अंतिम आकडेवारी 2 ऑक्टोबर 2020 ला बंद होईल. खरीप पिकांच्या पेरणीच्या  क्षेत्राची स्थिती  याप्रमाणे-

केंद्रीय जल आयोगाकडून मिळालेल्या माहिती नुसार 03.09.2020 रोजी देशातल्या 123 धरणात, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या 104 % तर गेल्या दहा वर्षाच्या सरासरी जलसाठ्याच्या 120 % जलसाठा उपलब्ध आहे.

Exit mobile version