गेल्या 24 तासात 2,568 नवीन रुग्णांची नोंद

भारतातील कोविडची उपचाराधीन रुग्णसंख्या आज 33,917 इतकी कमी झाली असून, भारताच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.08% आहे.

सकारात्मक कामगिरीची नोंद करत भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या 33,917 इतकी कमी झाली आहे. सध्याची उपचाराधीन रुग्णसंख्या ही देशाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत 0.08% आहे.

परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.72% वर पोहोचला आहे.  गेल्या 24 तासांत 4,722 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, (देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,46,171 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,568 नवीन रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात एकूण 7,01,773 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 97 लाखांहून अधिक (77,97,54,156) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात दैनंदिन आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 0.46% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.37%.इतका आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार भारताच्या देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 180 कोटी 40 लाखांहून अधिक (1,80,40,28,891) लसमात्रांचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,11,52,628 सत्रांतून हे उद्दिष्ट साध्य केले आले

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,02,731
2nd Dose 99,85,923
Precaution Dose 43,21,775
FLWs 1st Dose 1,84,11,615
2nd Dose 1,74,80,218
Precaution Dose 65,82,840
Age Group 15-18 years 1st Dose 5,59,68,909
2nd Dose 3,43,09,111
Age Group 18-44 years 1st Dose 55,34,55,646
2nd Dose 45,64,67,364
Age Group 45-59 years 1st Dose 20,25,55,219
2nd Dose 18,30,29,983
Over 60 years 1st Dose 12,66,05,098
2nd Dose 11,39,94,240
Precaution Dose 1,04,58,219
Precaution Dose 2,13,62,834
Total 1,80,40,28,891