Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात 10,488 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात लसींच्या 67.25 लाख मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 67,25,970 मात्रा देण्यात आल्या असून भारताने एकूण 116.50 कोटी (1,16,50,55,210) मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 1,20,41,157 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs 1st Dose 1,03,82,198
2nd Dose 94,00,674
 

FLWs

1st Dose 1,83,75,974
2nd Dose 1,63,06,666
 

Age Group 18-44 years

1st Dose 44,20,03,682
2nd Dose 19,01,32,509
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,05,79,345
2nd Dose 11,07,04,731
 

Over 60 years

1st Dose 11,31,14,229
2nd Dose 7,40,55,202
Total 1,16,50,55,21

गेल्या 24 तासात 12,329 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,39,22,037 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.30% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 147 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 10,488 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,22,714  आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.36% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 10,74,099 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 63.16 (63,16,49,378) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.94% असून गेल्या 58  दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.96% असून गेले 48 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 83 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version