कोविड – 19 अद्ययावत माहिती
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 112.34 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील सक्रिय रूग्णसंख्या 1,34,096 आहे. गेल्या 523 दिवसांतील सर्वात कमी (17 महिन्यांपासून)
एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.39 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात कमी आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.26 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात अधिक आहे.
गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 11,926 पर्यंत वाढल्याने कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,38,49,785
गेल्या 24 तासांमध्ये 10,229 नव्या रूग्णांची नोंद
दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी दर (1.12%) इतका असून गेल्या 42 दिवसांपासून हा दर 2 टक्के पेक्षा कमी.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.99%) इतका आहे, गेल्या 52 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
आत्तापर्यंत एकूण 62.46 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.