आयात कांद्यामुळे कांद्याचे दर थेट हजार बाराशेपर्यंत घसरले असल्याने ऐन दिवाळीत शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र ही स्थिती लवकरच बदलणार असून शेतकºयांना पुन्हा चांगला कांदा दर मिळण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण पुन्हा हा आयात केलेला कांदाच आहे. आयात करतानाच हा कांदा बºयापैकी सडलेला आहे. तसेच त्याची चव आणि उग्रपणा हे ग्राहकांच्या पसंतीला उतरत नसून हा कांदा जास्त भावाने खरेदी करण्यास ग्राहक नाखूश आहेत. त्यामुळे ग्राहकांचा ओढा पुन्हा स्थानिक लाल कांदद्याकडे असणार आहे आणि भविष्यात कांदद्याचे भाव पुन्हा वाढून शेतकºयांना चार पैसे जास्त मिळण्याची शक्यता आहे.
कांद्याचे आगार आणि महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी सुजीत दायमा म्हणाले की जरी आज तुर्की कांदा दाखल जरी झाला असला तरी या कांद्यात नुकसान भरपुर आहे .भारतीय बाजार पेठेत हाॅटेल व्यतिरिक्त कुठेच मागणी नाही स्थानिक काद्याला चव असल्याने भावात घसरण होणार नाही. दिवाळी नंतर भारतीय कांदा शंभरी गाठणार यात शंका नाहीच, शेतकरीवर्गाने काळजी करायचं कारण नाहीच.
मात्र असे असले तरी सध्या कांदा दर शेतकऱ्यांच्या बाजूचे नाहीत. परिणामी ऐन दिवाळीत कांदा शेतकर्याना रडवत आहे. तेजीत असलेले कांद्याचे दर खाली आणण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, ईजिप्त सह परदेशातील कांद्याच्या आयातीला पायघड्या घातल्या.देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहचला आहे. पिपंळगांव बाजार समितीतही तो आज विक्री साठी आला.त्याचा परिणाम आज बाजारभावावर झाल्याने तुकीस्थानच्या कांद्याने राज्यातील कांदा उत्पादकाचा घात केला आहे.कांद्याला उग्रवास असल्याने तुर्की चा कांदा चवीला मात्र वांधा आहे.
महाराष्ट्रातील नाशिक ,नगर जिल्ह्यासह देशातील बेंगलोर, इंदोर येथे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. पावसाने लाल कांद्याच्या पिकाची दाणादाण उडवून दिल्याने मोठी नासाडी झाली. लाल कांद्याचे आगमन लांबल्याने मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढली व कांद्याचे दर सात हजार रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचले. कांद्याच्या तेजीला ब्रेक लावण्यात साठी केन्द्र शासनाने अपशकुन केला. थेट तुर्की,इजिप्त च्या कांद्याच्या आयातीसाठी रेड कार्पेट टाकले.
तुर्कस्तान चा कांदा आज पिपंळगांव बाजार समिती त विक्री साठी आला आहे. त्यामुळे बाजार घसरण दिसली. गत वर्षी हा कांदा भारतात आला होता. पण उग्र वास, बेचव होता. चवीत वांधा असल्याने तुर्की चा कांदयाकडे नागरिक पाठ फिरवतील असे दिसते.
पिपंळगांव बाजार समितीत आजा तुर्की च्या कांद्याला सरासरी दीड हजार रूपये तर स्थानिक कांदा ला सरासरी साडे चार हजार रुपये प्रतीक्विंटल दर मिळाला. तुर्की चा कांदा दरावर दबाव आणत असल्याने शेतकर्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.