देशातील एव्हिअन फ्लूची सद्यस्थिती
दिनांक17 जानेवारी 2021 पर्यंत देशातील एव्हिअन फ्लूच्या महाराष्ट्रातील केंद्रीय कुक्कुटपालन विकास संस्था(CPDO) , मुंबई येथील आणि मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील खेडा रोड येथील प्रकरणांना पुष्टी दिली आहे.
महाराष्ट्रात आरआरटी अर्थात जलद प्रतिसाद दल तैनात केले असून मुंबईतील सीपीडीओसह सर्व बाधित केंद्रातील, बाधित पक्षांना नष्ट करण्यात येत आहे. या प्रकरणी बाधित भागांतील परीस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी देशातील सर्व बाधित भागांतील बाधित स्थळांवर केंद्रीय पथक भेटी देत असून या रोगाच्या कारणांचा वैज्ञानिक अभ्यास करत आहेत .
कुक्कुटपालन आणि कुक्कुट उत्पादन विक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा राज्यांनी विचार करावा आणि अशा प्रकारच्या उत्पादनांची विक्री ज्या भागांत संसर्ग नाही अशा भागांतून /राज्यांतून करावी अशी विनंती करण्यात आली आहे. शिजवलेली कोंबडी आणि अंडी मानवांसाठी सुरक्षित आहेत.याशिवाय ग्राहकांनी आधारहीन अवैज्ञानिक अफवांवर विश्वास ठेवू नये, ज्यामुळे संभ्रम निर्माण होतो. याचा कुक्कुटपालन आणि अंडी यांच्या बाजारावर परीणाम होतो इतकेच नव्हे तर कुक्कुटपालन आणि मका उत्पादकांवरही विपरीत परिणाम होतो ज्यांना कोविड-19 महामारीचा फटका या आधीच बसला आहे.
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने कोणत्याही पक्षाच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे.राज्य सरकारने विभागीय अधिकारी आणि सामान्य जनता यांच्यासाठी सुधारीत एव्हिअन एन्फ्लुएन्झा कृतीआराखडा 2021 च्या अनुषंगाने एव्हिअन फ्लू संदर्भात माहिती दिली आहे.
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या घटनांतील विलंब टाळण्यासाठी प्राणी संरक्षण आणि संसर्गजन्य प्रतिबंध कायदा 2009 च्या अन्वये राज्य सरकारने स्थानिक क्षेत्रात एव्हिअन फ्लू टाळणे बचाव, नियंत्रण,नष्ट करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
विभागाच्या सल्ल्यानुसार राज्ये, वृत्तपत्र जाहिराती, सामाजिक माध्यमे इत्यादींवरून राज्यात जनजागृती केली जात आहे.