Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज, उद्या पाऊस

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आली आहे. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नाशिक, पुणे परिसरात सकाळपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत असून मुंबत मुसळधार पाऊस सुरू आहे. ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागात आज वाऱ्यांचा वेग जास्त असणार आहे.

राज्यात कालपासूनच ढगाळ वातावरण आहे. पुण्यात बुधवारी सकाळपासून रिपरिप सुरू आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस सुरू आहे. मुंबईत मुसळदाऱ पाऊस सुरू असून किमान सरासरी तापमान २३.८ अंश सेल्सिअसवर आहे.

Exit mobile version