नाशिक-पुणेसह अनेक ठिकाणी दिवाळीत पाऊस; असा आहे कृषी सल्ला

नाशिक ५ :  ऐन दिवाळीच्या काळात नाशिक आणि परिसरात विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाळा आज सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण परिसरातील अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता या पूर्वीच हवामान खात्याने वर्तविली होती. कालच पुणे परिसरातही पाऊस पडला होता. अग्नेय अरबी समुद्रात तसंच लक्षद्वीपदवळ कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पाऊस पडत आहे. दरम्यान या पावसाचा अंदाज कृषी पंढरी ने मागेच वर्तविला होता.

मराठवाडा विभागासाठी पाऊस सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  मराठवाडयातील बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 05 नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील 48 तासात किमान तापमानात फारशी तफावत न होता, त्यानंतर किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

बागायती हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. बियाणे कमी खोलीवर (5 सें. मी.) पेरावे म्हणजे फांद्या, फुले व घाटे यांची जोमदार वाढ होते. बागायती पिकासाठी दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 10 सें.मी. ठेवावे.बागायती गहू वेळेवर पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते.वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकाची पेरणी करुन तीन आठवडे झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पूर्व हंगामी ऊसात पानकोबी, कांदे, बटाटे अंतरपीक घेतल्यास प्रति हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन व अतिरिक्त निव्वळ नफा मिळतो.हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 ल%E