अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.3 मिमी पावसाची नोंद

अमरावती, दि.29 : अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.3 मिमी इतक्या पावसाची नोंद झाला आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे:-

धारणी 7.3 मिमी, चिखलदरा 24.1 मिमी, अमरावती 9.8 मिमी, भातकुली 5.5 मिमी, नांदगाव खंडेश्वर 6.1 मिमी, चांदुररेल्वे 6.4 मिमी, तिवसा 10.2 मिमी, मोर्शी 8.3 मिमी,  वरूड 8.3 मिमी, दर्यापूर 8.2 मिमी, अंजनगाव 11.6 मिमी, अचलपूर 11.2 मिमी, चांदूरबाजार 9.6 मिमी, धामणगाव रेल्वे 9.0 मिमी असे एकूण आजचे पर्जन्यमान 9.3 मिमी एवढे आहे. अमरावती विभागात आज पर्जन्यमान 18.4 टक्के एवढे आहे.

यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान चांगले असून पर्जन्यमान अहवालानुसार आतापर्यत 99 टक्के पाऊस झाला आहे. तालुका निहाय पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे:-

धारणी 1067.6 मिमी, चिखलदरा 1395.5 मिमी, अमरावती 782.8 मिमी, भातकुली 699.3 मिमी, नांदगाव खंडेश्वर 753.2 मिमी, चांदूररेल्वे 710.4 मिमी, तिवसा 664.6 मिमी, मोर्शी 712.0 मिमी, वरूड 782.5मिमी, दर्यापूर 607.4 मिमी, अंजनगाव सुर्जी 594.0, अचलपूर 806.2 मिमी,    चांदूर बाजार 658.1 मिमी, तर धामणगाव रेल्वे येथे 859.7 मिमी, एवढा पाऊस पडला आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी  862.0 मिमी तर विभागात 749.8 मिमी एवढा पाऊस पडला आहे.