मालवाहतूकीला उत्तेजना देण्यासाठी रेल्वे विभागाकडून अनेक सवलती जाहीर
भारतीय रेल्वेने मिशन मोडवर काम करत, सप्टेंबर 2020 मध्ये सहा सप्टेंबर पर्यंत, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत झालेली मालवाहतूक (freight loading) आणि उत्पन्नाचे आकडे ओलांडले आहेत.
6 सप्टेंबर 2020 पर्यंत रेल्वेने 19.19 दशलक्ष टन मालवाहतूक केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत बघता, याच कालावधीत झालेल्या या मालवाहतुकी(17.38 दशलक्ष टन)पेक्षा यंदाची मालवाहतूक 10.41 टक्के (1.81 दशलक्ष टन) अधिक आहे. या काळात, भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 1836.15 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न 129.68 कोटी अधिक आहे.
हे सुद्धा वाचा
-
भारतातील बरे होणाऱ्या कोवीड-19 रूग्णसंख्येने 32.5 लाखाचा टप्पा ओलांडला
-
कोरोना : औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथे टेलिआयसीयू सेवेचा शुभारंभ
6 सप्टेंबर 2020 पर्यंत, भारतीय रेल्वेमार्फत 19.19दशलक्ष टन मालवाहतूक झाली ज्यात 8.11 दशलक्ष टन कोळसा, 2.59 दशलक्ष टन लोहखनिज, 1.2 दशलक्ष टन अन्नधान्य, 1.03 दशलक्ष टन खते आणि 1.05 दशलक्ष टन सिमेंटचा समावेश आहे.
विशेष म्हणजे मालवाहतूक आकर्षित करण्यासाठी रेल्वेकडून मालवाहतूकदारांना अनेक सवलती दिल्या जात आहेत. मालवाहतूकीच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणांना आता संस्थात्मक स्वरुप देण्यात येणार असून आगामी शून्य आधारित वेळापत्रकात त्याचा समावेश केला जाणार आहे.
कोविड-19 च्या संकटाचा संधी म्हणून उपयोग करत भारतीय रेल्वेने अधिक दक्षतेने आपली कामगिरी उत्तम करण्यासाठी पावले उचलली आहेत.