बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध – कृ‍षिमंत्री

पुणेदि. 7 : शेतकऱ्यांच्या अर्थकारणामध्ये रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्याअनुषंगाने चालू वर्षासाठी 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

रब्बी हंगाम 2021 राज्यस्तरीय नियोजन व आढावा बैठक कृषी आयुक्तालयपुणे येथे घेण्यात आलीत्यावेळी कृषीमंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमकृषी आयुक्त धीरज कुमारसचिव एकनाथ डवलेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव बोटेकृषी विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारीसहसंचालक व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालकठाणे, नाशिककोल्हापूरऔरंगाबादलातूरनागपूर व अमरावती जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारीआत्माचे प्रकल्प संचालक व कृषि आयुक्तालयातील  अधिकारीउपस्थित होते.

कृषीमंत्री श्री.भुसे पुढे म्हणालेमहा-डीबीटी पोर्टलवर शेतक-यांच्या सोयीकरीता शेतकरी योजना‘ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे‘ देण्याच्यादृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत प्रणाली विकसित केली आहे. पोर्टलवर समाविष्ट एकूण 11 कृषि योजनांतर्गत घटकांचा लाभ शेतक-यांना देण्यात येतो. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात अस्तित्वात असलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि असलेल्या नियमांमध्ये काही बदल केले पाहिजेत याबाबत केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. तसेच बीड पॅटर्न” राज्यात राबविण्याबाबत केंद्र शासनाला विनंती केली होती त्यास केंद्राने अजून मान्यता दिलेली नाही.

श्री.भुसे म्हणालेराज्यात सोयाबीन हे एक क्रमांकाचे पीक आहे. सोयाबीन पिकाचे उत्पन्न व उत्पादकता वाढविण्यासाठी नुकतीच लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिषद घेण्यात आली. याच धर्तीवर करडई पिकाच्या क्षेत्र व उत्पादकता वाढीच्या हेतूने नांदेड येथे राज्यस्तरीय करडई परिषद घेण्यात आली असून जळगाव येथे कापूस परिषद घेण्यात येणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. विकेल ते पिकेल‘ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार‘ अभियान राबविण्यात येत आहे.