Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोना रुग्णांसाठी पुण्यातील डॉक्टरांनी शोधला नवा उपचार

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी विविध औषधे आणि इन्जेक्शनचा वापर केला जात आहे. पुण्यातील काही डॉक्टरांनी आता लो मॉलिक्यूलर वेट हेपरिन (LMWH) नावाच्या इंजक्शनचा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केला आहे.  SARS-CoV2 व्हायरसमुळे रुग्णांच्या शरीरात काउंटर ब्लड इंफ्लेमेशन आणि ब्लड क्लॉटिंगची समस्या निर्माण व्हायरला लागते. हे रोखण्यासाठी हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचा दावा या डॉक्टरांनी केला आहे.

या यामुळे कोरोना रुग्णांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होऊन अनेक रुग्णांवर याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर,  डॉक्टरांनी या औषधासंदर्भात मांध्यमांना माहिती दिली. इटाली येथून आलेल्या रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे, की कोरोना व्हायरसमुळे, शरीरात छोटे ब्लड क्लॉट्स तयार होतात. अशात डॉक्टरांनी भारतात रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर करायलाही सुरूवात केली आहे.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच गंभीर रुग्णांसाठी या औषधाचा वापर करण्यात येत आहे. तसेच आता रुग्णांची संख्या वाढत असल्याने या औषधाचा वापरही वाढवण्यात आला आहे. तसेच हे औषध प्रभावी असल्याचेही दिसून आले आहे.

Exit mobile version