वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेत असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने हे कायदे रद्द करण्यासाठीच्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा कायदा रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर कऱण्यात आला आहे. आता हे विधेयक चर्चेसाठी येत्या अधिवेशनात संसेदत मांडले जाईल. हे कायदे संसदेत रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. तसेच नियोजनानुसार 29 नोव्हेंबरला संसेदवर ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली. हमीभाव व इतर मागण्यांवर शेतकरी अजूनही ठाम आहेत. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणीही शेतकरी संघटनांनी केली आहे.