Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की यांच्याशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंन्स्की यांच्याशी संवाद साधला.

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षमय परिस्थितीविषयी आणि वाटाघाटींविषयी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी तपशीलवार माहिती पंतप्रधानांशी बोलताना दिली. सध्या सुरू असलेला संघर्ष आणि त्याचा मानवतावादावर झालेला परिणाम याविषयी पंतप्रधान मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. हिंसाचार त्वरित थांबवावा, याचा पुनरूच्चार करून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, शांततापूर्ण मार्गाने निराकरण आणि, दोन्ही बाजूंमध्ये थेट संवाद याला भारताचा नेहमीच पाठिंबा असेल.

युक्रेनमधून 20,000 पेक्षा जास्त भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी युक्रेनच्या अधिका-यांचे आभार मानले. अद्याप काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंता व्यक्त करून त्यांना तेथून तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना भर दिला.

Exit mobile version