अकरा कोटीवर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री-किसान योजनेचा लाभ

प्रधानमंत्री-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थींची, त्या भूमीमालक शेतकरी कुटुंबाची ओळख पटविणे, या योजनेच्या पोटर्लवर लाभार्थींची सर्व माहिती अपलोड करणे ही जबाबदारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाची आहे. दि. 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत अशी सर्व माहिती अपलोड झालेल्या शेतकरी लाभार्थींची एकूण संख्या 11,07,62,287 आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीविषयी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री यांनी ही माहिती आज राज्यसभेमध्ये एका लेखी उत्तरामध्ये दिली.

प्रधानमंत्री-किसान योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या माहितीचा राज्यनिहाय तपशील अनुच्छेद- 1 मध्ये देण्यात आला आहे.

या योजनेविषयी जर काही तक्रारी येत असतील, तर त्यांच्या निवारणासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तक्रार निवारण समिती नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. मात्र केंद्राकडून अशा तक्रारींची कोणतीही माहिती अथवा आकडेवारी ठेवण्यात आलेली नाही.

 

अनुच्छेद -1 

प्रधानमंत्री किसान लाभार्थींचा पोर्टलवर अपलोड झालेल्या माहितीचा राज्यनिहाय तपशील  (दि. 17.09.2020 चा तपशील)