Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

उच्चदाब प्रणाली अंतर्गत 1 लाख 4 हजार 61 कृषी पंपांना वीज पुरवठा

मुंबई, दि. 10 : राज्यात फेब्रुवारी अखेर उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत 1 लाख 4 हजार 61 कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात  सांगितले.

सदस्य समीर कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी कृषीपंप योजनेपासून वंचित असल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी म्हटले आहे की, मार्च 2018 अखेर पैसे भरुन प्रलंबित असलेल्या कृषीपंप अर्जदारांच्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्याकरीता उच्चदाब वितरण प्रणाली योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 1 लाख 58 हजार 26 कृषीपंपांना वीज पुरवठा देण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख 4 हजार 61 पंपांना पुरवठा झाला आहे. उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत 723 व अन्य योजनेंतर्गत 407 अशा एकूण 1130 पंपांना जानेवारी अखेर वीज पुरवठा झाला आहे.

Exit mobile version